उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नव्या वर्षात विश्वासू नेता सोडणार साथ??

0
109
uddhav thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता लवकर महापालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटातील ६ नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर, आता माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) देखील पक्षाला रामराम करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत आणि निवडणूक झाल्यानंतर देखील साळवी यांची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली नसल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या त्यांच्या कुटुंबियांवरही एसीबीची चौकशी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवरच साळवी आगामी महिन्यात पक्षांतराचा मोठा निर्णय घेऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. परंतु साळवी भाजप की शिंदे गटात जाणार याबाबत कोणतेही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र शिवसेनेतील अंतर्गत वादाचा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.