दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एका मोठा आनंद सोहळा मानला जात आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो

रजनीकांत यांनी आपला पुरस्कार ‘गुरू आणि गुरू’ के बालचंदर यांना समर्पित केला. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. या सोहळ्याआधी रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एका गोष्टीचे दुःख व्यक्त केले होते. मी खूप आनंदी आहे की मी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मला हा पुरस्कार मिळेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला वाईट वाटले की, केबी सर (के बालाचंदर) आपल्यात नाही.

एप्रिल २०२१ मध्ये, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या चार दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोविड – १९मुळे हा पुरस्कार सोहळा आज पार पडला आहे. दरम्यान, रजनीकांत यांना यापूर्वी भारत सरकारने २०००मध्ये पद्मभूषण आणि २०१६मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनीदेखील सन्मानित केले आहे.

You might also like