व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बायकोसाठी कायपण ! आपल्या बायकोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पठ्याने केले असे काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल लोक आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी काय करतील याचा काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये घडला आहे. तिकडे एका नवऱ्याने आपल्या बायकोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर घेतले आणि सासरी हजर झाला. यामुळे हे प्रकरण खूप चर्चेत आले आहे. आजपर्यंत बायकोसाठी कायपण ऐकले होतेपण या पठ्याने ते करून दाखवले.

काय आहे नेमका प्रकार
हि घटना राजस्थानच्या करिली गावामधील आहे. नवऱ्याचे नाव सियाराम तर नवरीचे नाव रमा आहे. सियाराम हा पोस्टात कामाला आहे. सियाराम आणि रमाचे लग्न ठरले होते. त्यावेळी रमाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडे म्हणजेच सियारामकडे सासरी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मंगळवारी दोघांचे लग्न धुमडाक्यात पार पडले. पण हे लग्न राजस्थानमध्ये चर्चेचा विषय ठरले.

सियारामने आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल ४ लाख खर्च करून हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. लग्नानंतर सियाराम बायकोला सासरी नेण्यासाठी करिली गावात हेलिकॉप्टर घेऊन दाखल झाला. त्यावेळी रमाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपण व्यक्त केलेली इच्छा नवऱ्याने पूर्ण केली म्हणून तिला आकाश ठेंगणे वाटत होते. यानंतर सियाराम रमाला घेऊन हेलिकॉप्टरने आपल्या घरी परतला. हे आगळे-वेगळे दृष्य पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.