राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या अडचणीत वाढ; भाजपा अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । गेल्या महिन्यात झालेलं सचिन पायलट यांचं बंड, त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती. शमलेलं बंड. यानंतर राजस्थानातील गेहलोत सरकारच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे भाजपच्या अविश्वास प्रस्तावाची. भाजप गेहलोत सरकारविरोधात उद्या अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरु होते आहे. या अधिवेशनातच भाजपकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ही घोषणा केली आहे.

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आदेश दिल्यानंतर १४ ऑगस्ट अर्थात शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरु होतं आहे. या अधिवेशनात भाजप गेहलोत सरकार विरोधात अविश्स्वास प्रस्ताव आणणार असल्याचे कटारिया यांनी सांगितलं. याशिवाय राजस्थामधील अशोक गेहलोत सरकार लवकरच पडणार आहे असं कटारिया यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष आपल्या घरातले भांडण मिटवू पाहते मात्र ते मिटवणं त्यांना शक्य नाही.त्यामुळे गेहलोत सरकार लवकरच कोसळणार आहे असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे. आपल्याच अंतर्विरोधामुळे हे सरकार पडणार आहे. मात्र काहीही कारण नसताना काँग्रेस आपल्या अपयशाचं खापर काँग्रेस भाजपावर फोडते आहे. असंही गुलाबचंद कटारिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भाजपाच्या आमदारांची बैठक गुरुवारी जयपूरमध्ये पार पडली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेही सहभागी झाल्या होत्या. राजस्थानमधील भाजप आमदारांच्या या बैठकीत राज्यातील कोरोनाचे संकट, लॉकडाउन आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय राजस्थान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यचाही निर्णय घेतला गेला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment