Rajasthan Fighter Plane Crash : राजस्थानमध्ये विमान कोसळलं!! 2 जणांचा मृत्यू

Rajasthan Fighter Plane Crash
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rajasthan Fighter Plane Crash । अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना ताजी असतानाच राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागात आणखी एक विमान कोसळलं. मात्र हे प्रवासी विमान नव्हे तर भारतीय हवाई दलाचे विमान होते. या विमान अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला.

संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान आहे. हे विमान राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रतनगढ भागात दुपारी १२:४० वाजता कोसळले. विमान दुर्घटनेची माहिती (Rajasthan Fighter Plane Crash) मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी २ मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे.

२०२५ मधील तिसरा जग्वार विमान अपघात- Rajasthan Fighter Plane Crash

दरम्यान, २०२५ मधील हा भारतीय हवाई दलाचा तिसरा जग्वार लढाऊ विमानाचा अपघात आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी हरियाणातील अंबाला एअरबेसवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान सिस्टम बिघाडामुळे हा अपघात झाला. यानंतर २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमानही कोसळले. या अपघातात फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. आता आजचा राजस्थान मधील हा तिसरा विमान अपघात आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याचा शोध आता घेण्यात येईल.