जयपुर : रास्थानमध्ये गेहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामा दिला. राजस्थानमधील नवे मंत्री उद्या दुपारी ४ वाजता शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेहलोत यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यानंतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले. उद्या दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेस मुख्यालयात जाणार आणि तेथूनच सर्व गोष्टींचा निर्णय होईल.
All the ministers have resigned. When it comes to re-formation, the process has now been completed. This is a process. There is a PCC meeting at 2 pm tomorrow, everyone will go there. Further directions to us will be issued there: Pratap Khachariyawas pic.twitter.com/nPhcBiLul9
— ANI (@ANI) November 20, 2021
दुसरीकडे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा जयपूरला पोहोचले आहेत. नव्या मंत्र्यांच्या नावावर करार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजय माकन ज्या आमदारांना मंत्री बनवणार आहेत, त्यांना फोन करून माहिती देणार आहेत.
या आमदारांना मंत्री केले जाऊ शकते
नव्या मंत्रिमंडळासाठी सचिन पायलट गटातून मंत्रीपदासाठी संभाव्य नावे समोर येत आहेत. हेमाराम चौधरी, ब्रिजेंद्र ओला, दीपेंद्र सिंह शेखावत, रमेश मीना आणि मुरारीलाल मीना अशी त्यांची नावे आहेत. दुसरीकडे, गेहलोत गटामधून बसपचे राजेंद्र गुढा, अपक्ष- महादेव खंडेला, सन्यम लोढा, काँग्रेसचे आमदार- महेंद्रजीत सिंग मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शंकुतला रावत अशी संभाव्य नावे आहेत.