धक्कादायक ! मोठ्या बहिणीसोबत खेळता खेळता दीड वर्षांच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू

भरतपुर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भरतपुर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा पाण्याच्या टाकीत खेळता खेळता मृत्यू झाला आहे. हि घटना घडली तेव्हा घरातील सदस्यांना याची कल्पना नव्हती. जोपर्यंत कुटुंबीयांना आपल्या मुलीबद्दल कळालं तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मंगळवारी भरपूरमधील बयानामध्ये सायंकाळी उशिरा हि मन हेलावून टाकणारी घटना घडली.

या दीड वर्षांच्या चिमुरडीचे नाव विक्रांशी असे होते. ती आपली मोठी बहीण हिमांशी सोबत खेळत असताना घराच्या अंगणात आली. या ठिकाणी एक पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. खेळता खेळता अचानक विक्रांशी पाण्याच्या टाकीत पडली. यानंतर या मुलीच्या घरच्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. जेव्हा हि घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य शेतात काम करीत होते.

घरातील महिला या कामात व्यस्त होत्या. काही वेळानंतर जेव्हा घरातील महिलांचे मुलीकडे लक्ष गेलं तर त्यांना 3 वर्षांची हिमांशी अंगणात एकटीच खेळताना दिसली. मात्र तिची छोटी बहीण विक्रांशी कुठेच दिसली नाही. यानंतर सगळ्यांनी विक्रांशीला इकडे तिकडे पाहिलं तर ती पाण्याच्या टाकीत आढळून आली. यानंतर घरातील महिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता.