रेल्वेच्या तिजोरीत करोडोंची कमाई ; राजधानी एक्सप्रेसला मिळाला धनलक्ष्मी ट्रेनचा मान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अनेक लोक रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असून , भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. रोज लाखो प्रवासी आणि टनभर माल वाहतूक करतात . विविध प्रकारच्या ट्रेनमुळे रेल्वेचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेकजण सुपरफास्ट ट्रेनसारख्या वंदे भारत, शताब्दी किंवा दुरांतो यांना सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेन समजतात पण हे खरं नाही. तर रेल्वेची धनलक्ष्मी ठरलेली ट्रेन कोणती आहे, हे आज आपण जाणून घेऊणार आहोत.

बंगळुरू राजधानी एक्सप्रेस –

बंगळुरू राजधानी एक्सप्रेस (22692) ही भारतीय रेल्वेची सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन आहे. हजरत निजामुद्दीन ते KSR बंगळुरू दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 5,09,510 प्रवाशांची ने-आण केली. या ट्रेनमधून रेल्वेला 1,76,06,66,339 रुपये महसूल मिळाला आहे.

सियालदह राजधानी एक्सप्रेस –

कोलकाता आणि नवी दिल्ली यांना जोडणारी सियालदह राजधानी एक्सप्रेस (12314) ही दुसऱ्या क्रमांकाची कमाई करणारी ट्रेन आहे. या ट्रेनने 2022-23 मध्ये 5,09,164 प्रवाशांची वाहतूक केली आणि रेल्वेला 1,28,81,69,274 रुपये महसूल मिळाला.

दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस –

दिब्रुगड आणि नवी दिल्ली दरम्यान धावणारी ही ट्रेन तिसऱ्या स्थानावर आहे. या ट्रेनने 2022-23 मध्ये 4,74,605 प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवले आणि रेल्वेला 1,26,29,09,697 रुपये मिळवून दिले.

मुंबई राजधानी एक्सप्रेस –

नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी मुंबई राजधानी एक्सप्रेस (12952) चौथ्या स्थानावर आहे. या ट्रेनने 4,85,794 प्रवाशांची वाहतूक केली आणि 1,22,84,51,554 रुपये महसूल मिळवला आहे.

दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस –

देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन देखील दिब्रुगड राजधानी (12506) आहे. या ट्रेनने 4,20,215 प्रवाशांना डेस्टिनेशनवर पोहोचवून 1,16,88,39,769 रुपये उत्पन्न मिळवले आहे. भारतीय रेल्वेमध्ये सुपरफास्ट आणि लक्झरी ट्रेनच्या तुलनेत राजधानी एक्सप्रेस हि सर्वात जास्त कमाई करते. या ट्रेनमधील दर्जेदार सेवा आणि वेळेचे काटेकोर नियोजन यामुळे प्रवासी या गाड्यांना प्राधान्य देतात. त्यामुळेच, बंगळुरू राजधानी एक्सप्रेस भारतीय रेल्वेची धनलक्ष्मी ट्रेन ठरली आहे.