लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

ladaki bahin yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लाडकी बहीण योजनेसंदर्भात (Ladaki Bahin Yojana) नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सध्या महायुती सरकारकडून या योजनेतील अर्जांची छाननी सुरू आहे. अशातच आता सरकार योजनेतील रकमेद वाढ करणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारकडून या योजनेअंतर्गत (Government Scheme) महिलांना 1500 रुपये दिले जात होते. परंतु आता पंधराशे वरून ही रक्कम थेट 2100 रुपये होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे की, सरकार लाडक्या बहिणींना आता पंधराशेऐवजी थेट 2100 रुपये देणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा केले जातील. या बातमीमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सध्या लाडकी बहिण योजनेतील अर्जांची छाननी सुरू आहे. यात अपात्र ठरलेल्या आणि एकावेळी अनेक योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. आता या योजनेमध्ये आणखीन 12 लाख महिलांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. ज्या महिलांनी या योजनेसाठी खोटी माहिती भरली आहे, त्यांचे देखील अर्ज सरकार रद्द करणार आहे. त्यामुळे अर्ज भरलेल्या देखील अनेक महिलांना सरकार मोठा झटका देणार आहे.