कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर होवूनही त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे स्वाक्षरी का करत नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. जनशक्ती म्हणून स्वच्छ सर्वेक्षणात आम्ही नेमहीच पुढे राहणार आहोत. त्यात आमची चुक होणार नाही. जर चुक झालीच तर आमच्या आघाडीच्या नगरसेवकांचे आम्ही राजीनामे देवू. असा इशार जनशक्ती आघाडीचे गट नेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही चुकलो नाही, मात्र नगराध्यक्षा चुकल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही राजीनामा देण्याची तयारी ठेवावी, असेही यादव यांनी सुचीत केले. नगरपालिकेत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते
यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगांवकर, नगरसेवक हणमंत पवार, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, बांधकाम सभापती किरण पाटील, नगरसेवक गजेंद्र कांबळे, ओंकार मुळे, प्रितम यादव उपस्थित होते. यादव म्हणाले, नगराध्यक्षांच्या स्वाक्षरी न करण्यामुळे कराड स्वच्छ सर्वेक्षणातून नक्कीच बाहेर पडणार आहे. मात्र जनशक्ती आघाडी तसे होवू देणार नाही, असे स्पष्ट करून यादव यांनी स्वच्छतेसाठी प्रशासनाला सोबत घेवून आम्ही जीवाचे रान करून देशात सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक टिकवून ठेवू, यंदा स्वच्छ सर्वेक्षणातून बाहेर पडावे, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी नगरसेवकांना पत्रे दिले आहे.
त्यात नगरसेवकांचा काहीही दोष नाही. स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर आहेत. नगराध्यक्षा शिंदे यांनी त्यावर स्वाक्षऱ्या करत नाहीत. स्वच्छ सर्वेक्षणात जनशक्तीचे नगरसेवक कुठे कमी पडलेले नाहीत. तसे वाटत असेल जनशक्तीचे सर्व नगरसेवक राजीनामा देतील. चुक नसतानाही खापरही फोडून घेणार नाही. जनशक्तीने विरोधकांना विकासकामांत चार वर्षात सहकार्य केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत आम्ही पुन्हा एकदा कराडला देशात अव्वल आणूच. बहुमत असताना देखील नगराध्यक्ष मनमानी कारभार करीत आहेत. यापुढे त्यांचा तोच हेका राहिल्यास आम्ही निश्चीत कायदेशीर कार्यवाही करणार आहोत. नगरसेवक वाटेगावकर, सौ हुलवान व हणमंत पवार यांनी नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्यावर जोरदार टिका केल्या. ठरावावर सात महिन्यापासून सह्या होत नाहीत, हे योग्या नाही, असे सांगून वाटेगावकर म्हणाले, नगराध्यक्षा सत्तेचा चुकीचा वापर करीत आहेत. त्या त्यांचा अधिकार मर्यादीत अशताना बहुमताला डावलून शहराला वेठीस धरीत आहेत. यापुढील काळात ते खपवून घेतले जाणार नाही.
पवार म्हणाले, नगराध्यक्षा शिंदे यांना अधिकाऱ्यांवरही गैरविश्वास दाखवला आहे. त्यामुळे अधिकारीही त्यांच्याकडे काम घेवून जाताना विश्वासाने जात नाहीत. त्याचा परिणाम स्वच्छ सर्वेक्षणावर होतो आहे. मात्र जनशक्ती तेस होवू देणार नाही.