आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! Mucormycosis या बुरशीजन्य आजारावर होणार मोफत उपचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र्र – राज्यात सध्या कोरोना वायरसने थैमान घातले असताना आता एक नवीनच आजार समोर आला आहे. या आजाराचे नाव म्युकरमायकोसिस असे आहे. या आजाराने नागरिकांच्या चिंतेत वाढ केली आहे. हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक आहेत. या आजाराबाबत राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या आजरावर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करण्यात येणार आहे. तसेच या आजाराचे लवकर निदान आणि उपचार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील करण्यात येणार आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

नुकतेच कोरोनातून उपचार घेऊन बरे झालेल्या अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. या आजारामध्ये नाकाजवळ, ओठांच्या आजुबाजुला काठे ठिपके दिसतात. जर या आजारावर त्वरित उपचार झाले नाही तरनाक किंवा श्वसनयंत्रणे मार्फक बुरशी शरिरात प्रवेश करते आणि नंतर ती डोळे, मेंदू यावर प्रामुख्यानं हल्ला करते असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच या आजाराची लक्षणे दिसल्या दिसल्या त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. यामुळे लोकांना या आजाराबाबत समजावे म्हणून मोठ्या प्रमाणामावर जनजागृती करणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

म्युकरमायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारे अ‍ॅम्फोतेरसीन हे औषध खुप महाग आहे. या आजारासाठी सात दिवस दोन वेळा म्हणजे चौदा इंजेक्शनचा डोस घ्यावा लागतो. या आजारामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याला ते अनेकदा परवडणार नाही यामुळे या औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment