राजेश टोपे यांची मोठी घोषणा ; 18+लसीकरणाला तूर्तास ब्रेक, वृद्धांना आधी प्राधान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ याअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच लसीकरणाची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण देशात एक मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकारने या लसीकरण मोहिमेला तूर्तास ब्रेक लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबतची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना टोपे म्हणाले, ‘ राज्यात ॲक्टिव केस कमी होत आहेत. बरे होण्याचा दर वाढतोय दोन लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहेत. व्हॅक्सिसीन एक कोटी 84 लाख झाले आहेत. आता 35000 व्हॅक्सिसीन उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेली तीन लाख रुपये व्हॅक्सिसीन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहेत. त्यांना दुसरा डोस देणे गरजेचे आहे त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटातील व्यक्तींना दिले जाणार आहेत. असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या लसींचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहे त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसी या 45 वर्षां वरील व्यक्तींना दिल्या जाणार आहेत अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

म्हणून घेतला निर्णय …
दरम्यान हा निर्णय का घेतला गेला याचं कारण देखील राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना लस देण्याचं जाहीर केलं होतं पण लसींचा साठा कमी उपलब्ध आहे. दुसरा लसीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो म्हणून 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण 45 वरील वयोगटासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे अठरा वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाऊन करावा लागेल. फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय घेऊ असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment