TRP रेटिंग घोटाळ्यामुळे राजीव बजाज यांनी ‘या’ 3 वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । TRP रेटिंगमध्ये पुढे रहाण्यासाठी, काही चॅनेल्स जाणून बुजून चुकीचे मानले जाणारे कंटेंट दाखवत आहेत. या कारणास्तव, आता बातमी आली आहे की, ऑटो सेक्टर मधील दिग्गज बजाज ऑटोने आपल्या जाहिरातींसाठी तीन वृत्तवाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे. रिपब्लिक टीव्हीसह दोन मराठी वाहिन्यांवर बनावट TRP (Television Rating Point) केल्याची बातमी आल्यानंतर प्रख्यात उद्योगपती एमडी राजीव बजाज म्हणाले की, त्यांची कंपनी बजाज ऑटोने आपल्या जाहिरातींसाठी तीन वाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. बजाजच्या या निर्णयामुळे या तिन्ही वाहिन्यांच्या महसुलावर आगामी काळात चांगलाच परिणाम होऊ शकेल.

आमचा ब्रँड कोणत्याही संदिग्ध ब्रँडशी एसोसिएट असू शकत नाही: बजाज
बजाज म्हणाले की, त्यांच्या कंपनीचा ब्रँड कधीही समाजात द्वेष पसरवणार्‍या (hate mongering) कोणत्याही गोष्टीशी कधीही जोडला गेलेला नव्हता. ते म्हणाले की, मजबूत ब्रँड हाच तो पाया आहे ज्यावर आपण मजबूत व्यवसाय बनवता. बजाज यांनी एका बिझनेस चॅनेलला सांगितले की, या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे की आमचा ब्रँड हा अशा ब्रँड किंवा कोणत्याही संस्थेशी कधीही एसोसिएट होऊ शकत नाही ज्याबद्दल शंका आहे. मात्र, आपल्या मुलाखतीत त्यांनी या तिन्ही वाहिन्यांचे नाव घेतलेले नाही.

हे चॅनेल्स समाजासाठी हानिकारक असल्याचे सांगितले आहे
ब्लॅकलिस्ट केलेल्या वाहिन्या या समाजासाठी हानिकारक असल्याचे सांगत राजीव बजाज म्हणाले की, आम्हाला माहित आहे की आमचा ब्रँड आपल्या समाजात विष पसरवण्यासाठी कोणत्याही गोष्टीशी संबंध जोडला जाणार नाही. बनावट TRI च्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी याचा चॅनल रिपब्लिक टीव्ही (Republic TV) बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे. या प्रकरणात अनेक लोकांना अटकही करण्यात आली आहे. यानंतर बजाज ऑटोने हा निर्णय घेतला आहे.

फ्रॉड TRP रॅकेटचा लवकरच पर्दाफाश: मुंबई पोलिस
फ्रॉड TRP च्या रॅकेटचा भांडाफोड केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी फ्रॉड TRP रॅकेटचा भांडाफोड केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणाले की फॉल्स TRP रॅकेट सुरू आहे. रिपब्लिक टीव्हीसह अन्य तिन्ही वाहिन्यांचा TRP मध्ये फेरफार केल्याबद्दल (TRP Manipulation) तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. TRP च्या या हेरफेरात 2 जणांना अटकही करण्यात आली आहे.

या चॅनेल्सवर जाहिरात करण्यापासून काही इतर बड्या कंपन्या आपले हात मागे खेचू शकतात
असा विश्वास आहे की, येणा-या काळात या चॅनल्सची जाहिरात करण्यापासून काही इतर बड्या कंपन्या आपले हात मागे खेचू शकतात. जरी सध्या अनेक कंपन्या त्यांच्याबरोबर काम करत आहेत. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा फ्रॉड TRPचा व्यवसाय 30 ते 40 हजार कोटींचा आहे. जर मुंबई पोलिसांची ही कारवाई योग्य असेल तर येणाऱ्या काळात या कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा गमवावा लागू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment