हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी कोरोनावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राजीव सातव यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ”राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी उद्या 17 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,” अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली
45 वर्षीय राजीव सातव गांधी कुटुंबीयाच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जायचे. ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) चे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.