राहुल गांधी म्हणजे राजकारणातील सर्वोत्तम फिनिशर; धोनीचे नाव घेत राजनाथ सिंह यांची टीका

rajnath singh rahul gandhi
rajnath singh rahul gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी म्हणजे राजकारणातील MS धोनी आहे, धोनी हा क्रिकेटमधील फिनिशर आहे तसेच राहुल गांधी हे राजकारणातील फिनिशर आहेत. ते काँग्रेस लवकर संपवणार असं म्हणत राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका सभेत बोलताना राजनाथ सिंह बोलत होते.

राजनाथ सिंह म्हणाले, काँग्रेसचे भ्रष्टाचाराशी “अतूट” नाते आहे. “एकेकाळी भारतीय राजकारणात काँग्रेसचा दबदबा होता, पण आता दोन-तीन छोट्या राज्यांमध्येच काँग्रेसचे सरकार आहे. “कधीकधी मला आश्चर्य वाटते की हे असं का होत आहे, म्हणून मी या निष्कर्षावर पोहोचलो कि राहुल गांधी म्हणजे राजकारणातील सर्वोत्तम फिनिशर आहेत. त्यांच्यामुळेच अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली.

राजनाथ सिंह यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ चेही समर्थन केलं. एक देश एक निवडणूक या संकल्पनेमुळे आपला वेळ आणि संसाधने वाचतील. तसेच एकाच वेळी निवडणुका घेतल्याने भारतीय लोकशाही आणखी मजबूत होईल असा दावाही राजनाथ सिंह यांनी केला. 2045 पर्यंत भारत महासत्ता होईल, भाजप राष्ट्र उभारणीचे राजकारण करत आहे याउलट काँग्रेसने सत्तेत असताना अनेक आश्वासने दिली मात्र ती पूर्ण केली नाहीत. जर काँग्रेसने आश्वासने पूर्ण कलेची असतील तर भारत यापूर्वीच शक्तिशाली देश बनला असता असं म्हणत राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.