गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलोय, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | अजय निमसे 

“केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एफ.आर.पी. निश्चित केला आहे. परंतु तोही आता भेटत नाही. ट्रेजरी खाली करणारे मुख्यमंत्री कुठे गायब झाले आहेत. गायब झालेल्या मुख्यमंत्र्यांना शोधत आम्ही पुण्यात पोहोचलो आहोत” असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला. पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘साखर आयुक्तांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही पुण्यामध्ये आलो आहोत. ऊस दर नियंत्रण अध्यादेश १९६६ नुसार ऊस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत जर साखर कारखान्यांनी केंद्र सरकारने ठरवून दिलेली ऊसाची किंमत दिली नाही तर ते सगळे कारखानदार सरकारचे थाकबाकीदार आहेत असं समजून त्यांच्यावर सक्तीच्या वसुलीची कारवाई व्हायला पाहिजे’ असे म्हणून अद्यापपर्यंत कारवाई का झाली नाही? असा सवाल शेट्टी यांनी यावेळी केला. ‘सक्तीच्या जप्तीची कारवाई करा, साखर जप्त करून ती लिलावात विकून आमचे पैसे ताबडतोप द्या’ अशी मागणी करत ‘तसे आदेश दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही’ असा इशाराहि राजू शेट्टी यांनी सरकारला यावेळी दिला.

“कोण म्हणताय देत न्हाय? घेतल्याशिवाय राहत न्हाय!” “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो” अशी घोषणाबाजी करत पुण्यातील अलका टोकीज चौकातून शेतकरी मोर्चाला सुरवात झाली. राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो शेतकरी मोर्चात सामील झाले होते. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात योगेंद्र यादव आणि रविकांत तुपकर देखील सामील झाले होते.

इतर महत्वाचे –

मलकापूर नगरपंचायत निवडणूक निकाल : कॉंग्रेस ला बहुमत

मध्यरात्रीच देवांना दुधाचा अभिषेक, राजु शेट्टींनी केली पंढरपूरातून आंदोलनाची सुरवात

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

Leave a Comment