भाजप आमदाराच्या पत्नीचा बच्चू कडूंना पाठिंबा!! म्हणाल्या, विषय शेतकऱ्याचा आहे

BACHHU KADU PRIYA SHINDE
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । ‘शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा’ हि पदयात्रा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली निघाली आहे. पदयात्रेच्या आजच्या सहाव्या दिवशी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी वृद्ध व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू भाऊ भावुक झाल्याचे देखील पहायला मिळाले. शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर पदयात्रा पुढे धानोरा गावात पदयात्रा आली असता आर्णी केळापूर मतदारसंघाचे भाजप राजू तोडसाम यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या यात्रेचे स्वागत केले. यावेळी भाजप आमदाराची पत्नी असले तरी मला स्वतःच मत आहे. विषय शेतकऱ्याचा असल्याने बच्चूभाऊंच्या ७/१२ कोरा यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी आले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून भर पावसातही हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन बच्चू कडू यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला आक्रमकपणे सुरुवात केली आहे. ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.

आज सहाव्या दिवशी पदयात्रा तिवरी तुपटाकळी येथून मार्गस्त होत असताना तरोडा येथे बच्चू कडू यांनी एका शेतकऱ्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. तसेच बच्चू भाऊंसोबत संवाद साधताना शेतकऱ्याने त्यांचं तोंड भरून कौतुक करत पाठ थोपटली व कष्टकरी शेतकरी सदैव पाठीशी उभा आहे “आता थांबायचं नाय,” असे सांगितले. त्या शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्यानंतर बच्चू भाऊ देखील भावुक झाले. त्यांनी शेतकऱ्याला थेट वाकून नमस्कार केला.

बच्चू कडू यांच्या आवाहनानंतर त्यांनी काढलेल्या सातबारा कोरा कोरा यात्राला ठिकठिकाणी गावागावातून वृद्ध, तरुण महिला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या सभांना शेतकरी, महिला मोठ्या संख्येने हजेरी सहभागी होत आहेत