राज्यसभा मार्शल आता आर्मी स्टाइलमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र – राज्यसभेच्या २५० व्या सत्राच्या सुरुवातीलाच एक असं दृष्य पाहायला मिळालं, ज्यामुळे सर्वच खासदार विचारात पडले. आसन व्यवस्थेत मदत करणाऱ्या मार्शलचा नवीन गणवेश पाहिल्यानंतर हा प्रसंग उद्भवला.

171a.png

‘‘माननीय सदस्यों, माननीय सभापति जी’’ या वाक्याने पगडी घालून मार्शलने केलेल्या घोषणेने सर्वसाधारणपणे सभागृहाचं कामकाज सुरु होतं. पण आज हे मार्शल नव्या पोशाखात दिसले.सोमवारी सभागृहाचं कामकाज सुरु झालं तेव्हा या मार्शल्सच्या डोक्यावर पगडीऐवजी निळ्या रंगाची टोपी होती. सोबतच मार्शल्सने आधुनिक सुरक्षा रक्षकांप्रमाणे गणवेशही घातला होता.

171d.jpg

राज्यसभा सचिवालयातील सूत्रांच्या मते, एका उच्चस्तरीय निर्णयानंतर सभागृहात तैनात मार्शल्सचा गणवेश बदलण्यात आला आहे. मार्शल्सला आता सफेद रंगाची पगडी आणि पारंपरिक गणवेशाऐवजी आता निळ्या रंगाचा गणवेश आणि टोपी परिधान करावी लागेल. गेल्या अनेक दशकांपासूनच्या या परंपरागत गणवेशात बदल करण्याची मागणी मार्शल्सकडूनच करण्यात आली होती.येत्या हिवाळी अधिवेशनापासून नव्या गणवेशात मार्शल दिसणार आहेत.

Leave a Comment