करोनामुळं राज्यसभेची निवडणूक स्थगित; येत्या २६ मार्चला होणार होती निवडणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगित केल्या आहेत. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांवर निवडणुक होणार होती. करोनाच्या वाढत्या संसर्ग टाळण्यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून अद्याप या निवडणुकांची नवीन तारीख जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती पाहूनच तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान राज्यसभेच्या ५५ जागांपैकी ३७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्रातील सातही जागांचा समावेश आहे. त्यामुळं राज्यसभेची निवडणूक पुढं ढकलल्याने महाराष्ट्रावर कुठल्याही परिणाम होणार नाही आहे. महाराष्ट्रातील सातही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील निवडणूक अतिरिक्त उमेदवारामुळे खूप चुरशीची बनली आहे. विशेष करून मध्यप्रदेशमध्ये जोतिरादित्य सिंदिया आणि दिग्विजय सिंह यांपैकी कोण राज्यसभेवर निवडून जाणार आहे याची उत्सुकता लागलेली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणुकीला स्थगिती दिल्यानं ही उत्सुकता आणखी ताणली गेली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment