राकेश झुनझुनवाला यांचा फॅमिली सोबतचा ‘कजरा रे’ गाण्यावरचा video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन – भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेले आणि भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी (Rakesh Jhunjhunwala) मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 62 वर्षांचे होते. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा प्रवास थक्क करणारा आहे. दरम्यान, त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे ते व्हिलचेअरवरच असायचे. त्यांच्या निधनानंतर त्यांचा फॅमिली सोबतचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा जन्म 5 जून 1960 साली एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडिल आयकर अधिकारी होते. 1986 साली कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याकाळी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स केवळ 150 अंकांवर होता. शेअर बाजारामध्ये त्यांनी पाच हजारांपासून सुरू केलेली गुंतवणूक आज कोट्यावधींच्या घरात आहे. शेअर बाजारामध्ये ‘बिग बुल’ समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवालांनी (Rakesh Jhunjhunwala) हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा कमावला होता.2003 साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म ‘रेअर एन्टरप्रायझेस’ची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवले होते.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?