हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. राकेश झुनझुनवाला हे ज्या शेअर्स ला हात लागतील त्या शेअर्स मधून प्रॉफिट मिळवण्याची त्यांची ताकद होती. 5 हजारांची गुंतवणूक ते शेअर मार्केटचा बादशहा इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर मार्केट कडे होता. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने त्यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली आणि तब्बल 44 हजार कोटींचे साम्राज्य उभे केले.
राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये त्यांच्या कष्टाने कमावलेल्या 5,000 रुपयांच्या गुंतवणूकिसह शेअर बाजारात उडी घेतली. आणि काही काळानंतर त्यांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवण्याची चांगली संधी दिसली. या संधीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपल्या भावाच्या एका क्लायंटकडून 1.25 लाख रुपये घेतले आणि fixed diposite च्या तुलनेत 18% पर्यंत चांगला नफा मिळवून देईल अस सांगितले. हे ऐकताच त्यांच्या त भावाचे मित्र हसले आणि हसले. आणि त्यांना पैसे दिले.
अशाप्रकारे त्यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या शेअर बाजाराच्या प्रवासासाठी पैसे जोडले. त्यांनी प्रत्येकी 43 रुपये दराने TATA Tea चे 5,000 शेअर्स खरेदी केले आणि अवघ्या 3 महिन्यांत TATA Tea चा शेअर 43 रुपयांवरून 143 रुपयांवर पोहोचला. राकेश झुनझुनवाला यांनी TATA Tea चे शेअर्स विकले आणि त्यातून 3 पट जास्त नफा कमावला.
1989 मध्ये जेव्हा अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार खाली जाण्याची भीती लोकांमध्ये होती, तेव्हा राकेश झुनझुनवाला यांचा इतक्या वर्षांचा अनुभव कामी आला आणि शेअर बाजार वर जाण्याच्या आशेने त्यांनी मोठी रक्कम गुंतवली. आणि त्याच्या अंदाजाप्रमाणेच घडले, अर्थसंकल्पानंतर बाजारात तेजी आली आणि राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती २ कोटींवरून थेट ४०-५० कोटींवर गेली.
राकेश झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते.तसेच प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते.
आज 14 ऑगस्ट 2022 ला राकेश झुनझुनवाला यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बीच कॅंडी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.