अखेर भांडण मिटलं..राखी आणि मिकाची जादुवाली झप्पी वायरल; पहा व्हिडीओ

0
82
Mika_Rakhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यातील लॉकडाऊनमूळे बऱ्याच लोकांचे व्यवसाय, उद्योग सर्व काही बंद आहे. परिणामी अनेकांना दोन वेळचे जेवण मिळणेही मुश्किल झाले आहे. अशा कठिण काळात प्रत्येकजण स्वतःला जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहेत. यात अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे. बॉलिवूड सिंगर मिका सिंगनेदेखील फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लंगर सेवा सुरु केली आहे. तास मिका सिंग अन्य कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र त्याच्या या कार्यामुळे नक्कीच हजारो लोक त्याला आशीर्वाद देत असतील. यातच राखी सावंतची एंट्री झाली आहे. राखी आणि मिका चं समीकरण काय आणि कस आहे ते आता वेगळं सांगायला नकोच. पण गेल्या गोष्टी विसरून आता राखी आणि मिका यांचं नातं सुरळीत झाल्याचे दिसत आहे. नुकतीच या दोघांची आकस्मिक भेट मोठ्या चर्चेत आहे. या भेटी दरम्यान यांनी चक्क एकमेकांना आलिंगन दिले आहे. तर राखीने मिकाचे भरभरून कौतुकही केले आहे.

https://www.instagram.com/p/CPVVNOKjlQI/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही महिन्यांपासून मिका सिंग वेगवेगळ्या परीने कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. याआधीही मिकाने दिल्लीमध्ये गरजूंसाठी लंगर ठेवून जेवणाची व्यवस्था केली होती. नुकताच वायरल झालेल्या व्हिडीओमुळे आणि फोटोंमुळे मिकाचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. मध्यंतरी मिका सिंग चक्क गरजूंना पैसे वाटताना दिसला होता. कोरोना महामारीच्या कठीण काळात मिका ज्याप्रकारे निस्वार्थ लोकांची सेवा करत आहे, ते पाहून राखी सावंतने मिकाचे भरभरुन कौतुक केले. मीडिया कॅमेऱ्यासमोर नेहमीप्रमाणे राखी पोज देत असताना मध्येच तिची भेट मिका सिंगसोबत झाली. एकमेकांना भेटल्याचा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी राखीने मिकाचे भरभरुन कौतुक केले.

https://www.instagram.com/p/CPN4C1FIr6j/?utm_source=ig_web_copy_link

कोरोना काळात मिका ज्या पद्धतीने गरजुंची सेवा करत आहे ते पाहून त्याचे करावे तितके कमीच आहे. ”ये सिंग बडे ही दिल वाले होते है, हमेशा मदत करते है” म्हणत राखीने मिकाचे कौतुक केले. हे कमीच तर मिका सिंग ज्याप्रकारे लोकांची मदत करतोय ते पाहून राखी चक्क मिकाच्या पायाच पडली आणि असेच काम करत राहा तुमच्या सारख्या लोकांची देशाला गरज आहे असे म्हणाली. यावेळी मिकानेही राखीचे भरभरून कौतुक केले आहे. ‘बिग बॉस’ कार्यक्रमाला मिळालेले यश हे केवळ राखीमुळे आहे असेही त्याने म्हटले. दरम्यान मिका सिंग म्हणाला कि मी इथून जात होतो तेव्हा हि दिसली आणि मी राखीला दुर्लक्ष करू शकत नाही. सोबतच त्याने तो राहत असलेली त्याची बिल्डींग दाखवत राखील त्याच्या घरी येण्यासाठी खास आमंत्रणही दिले.

https://www.instagram.com/p/CJLTTEprUCd/?utm_source=ig_web_copy_link

२००६ साली मिका सिंगच्या बर्थ डे पार्टीमध्ये त्याची मैत्रीण राखी सावंत अतिशय आनंदाने सहभागी झाली होती. त्यावेळी मीकाने राखीला पाहुणे आणि उपस्थित मीडिया कॅमेरा या सर्वांसमोर पब्लिकली किस केले होते. या घटनेमुळे राखी सावंत चांगलीच भडकली होती. मीकाने आपल्याला जबरदस्तीने किस केल्याची तक्रार तिने मिकाविरुद्ध पोलिसांत दाखल केली होती. साधारण १४ वर्षांपूर्वी मीका सिंगने केलेला हा पराक्रम आजही लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. त्यामुळे मिका आणि राखी हे समीकरणही लोकांना चांगलेच आठवत आहे. मात्र त्यांच्या या भेटीनंतर हा १४ वर्षाचा काळ सरता त्यांच्यातील वादविवादही संपले असावेत असा अंदाज लावणे काही वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here