‘टिप टिप बरसा पानी’वर राखी सावंतचे लटके झटके; व्हिडीओ झाला वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध ड्रामाक्वीन राखी सावंतचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज हा नेहमीच लाखो प्रेक्षकांना आवडत असतो. मुख्य म्हणजे या लॉकडाउनच्या काळातही राखी सावंत मात्र आपल्या चाहत्यांचे एंटरटेनमेंट करण्यापासून चुकलेली नाही. ती कधी मुंबईच्या रस्त्यांवर पीपीई किट घालून भाजी घेताना दिसते तर कधी कॉफी शॉपमध्ये मिकाच्या पाया पडताना. इतकच काय तर कधी कधी लड़की नाही देखी क्या अंकल? म्हणत लोकांचा क्लास घेताना दिसते. त्यामुळे राखी नक्की कुठे आणि काय काय करेल याचा नेम लावता येणे शक्य नाही. नुकतीच राखी पुन्हा एकदा कॅमेरा लेन्समध्ये स्पॉट झाली आहे. यावेळी मात्र पावसाच्या वातावरणाने प्रफुल्लित झालेली राखी रवीना टंडनच्या टीप टीप बरसा पानी या गाण्यावर थिरकताना दिसली.

https://www.instagram.com/p/CP8Sl64Dgtg/?utm_source=ig_web_copy_link

सध्या मुंबई महानगरात जोरदार पावसाचे आगमन झाले असून अजूनही पावसाची तीव्रता तितकीच कायम आहे. याच पावसात राखी सावंत टिप टिप बरसा पानी या गाण्यावर लटके झटके देताना कॅमेराज स्पॉट झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड झाला. तिचा हा हटके आणि बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो. त्यामुळे हा व्हिडीओ देखील तिच्या चाहत्यांना प्रचंड भावला आहे. राखीचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर अगदी २०-२५ तासांतच त्याला ३ लाखांहून अधिक लोकांचे व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून राखीचे फॅन्स तिचे भरभरून कौतुक करत आहेत. अनेकजण ती एन्टरटेन्मेंट क्वीन आहे असे देखील म्हणत आहेत.

https://www.instagram.com/p/CP483fgH5mX/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी मीडिया फोटोग्राफरच्या दुनियेत राखी सावंतचे विविध व्हिडीओ चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या फिटनेसकडेदेखील खूप लक्ष देताना दिसत आहे. गेल्या काही काळात तिचे वजन खूप वाढल्याने ते घटवण्यासाठी राखी फिटनेस सेंटरमध्ये अर्थात जिममध्ये आपला घाम गाळतेय. तिने काही दिवसांपूर्वी योगा करतानाचा देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. पण या व्हिडिओमुळे तिला सोशल मीडियावर अनेकांकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले होते.

Leave a Comment