भाजपच्या वेबसाईटवरील आक्षेपार्ह प्रकारावर रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आणि रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या भाजपच्या वेबसाईटवर  नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख असल्याचे स्क्रीनशॉट समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, भाजपकडून ही चूक झाली नसावी, असा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडलेला प्रकाराची माहिती मला काल संध्याकाळी झाली. त्यानंतर मी स्वतः पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. या प्रकाराची चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसेंनी दिली.

झालेल्या प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती. एका महिला म्हणून, एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. त्यामुळे दु:ख वाटले’ अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

‘या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे, पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, असंही रक्षा खडसे म्हणाल्या.

गृहमंत्र्यांकडून कारवाईचा इशारा

दरम्यान, भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजपने दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी. अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल”, असं अनिल देशमुख ट्विटरवर म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment