“हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात हिंदू सण साजरा करणारच”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरीही राज्य सरकारकडून अद्यापही सण, उत्सव आणि समारंभ साजरे करत असताना निर्बध लादले जात आहेत. काल गृह खात्याकडून होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली. त्यावरून भाजप आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर ट्विट करीत निशाणा साधला आहे. “हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असे कदम यांनी म्हंटले आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी आज ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहार की, “महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असे कदम यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

काय घातले आहेत निर्बंध ?
राज्य सरकारच्या वतीने होळी सणाच्या पार्श्वभूमीवर निर्बध घातले गेले असून त्यामध्ये त्यांनी रात्री १० च्या आत पेटवावी. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावू नयेत. होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल. होळी खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घ्यावी. कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.