Ram Mandir : 22 जानेवारीला एक ऐहसिक क्षण घडला अयोध्येत प्रभू रामाची मोठ्या थाटामाटात प्रतिष्ठापणा करण्यात आली. तब्बल 500 वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत (Ram Mandir) विराजमान झाले आहेत. आपण या सोहळ्याचे साक्षीदार झालो. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उभारणीसाठी भरतवासीयांनी मोठा हातभार लावला आहे. देश आणि परदेशातील राम भक्तांनी मन मोकळेपणाने राम मंदिराच्या उभारणीसाठी दान दिले आहे. गुजरात मधील एका हिरे व्यापाऱ्याने मोठे दान प्रभू रामाच्या चरणी अर्पण केले आहे. तब्बल १०१ किलो सोन्याचे दान या राम भक्ताकडून करण्यात आले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती ज्याने राम मंदिराच्या (Ram Mandir) उभारणीसाठी 101 किलो सोने दान केले आहे.
101 किलो सोने दान
सध्याचे सोन्याचे भाव पाहता भुवया उंचावयाला होतात अशा वेळी तब्बल १०१ कोलो सोने दान म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हे सांगायला नको. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, सुरतच्या हिरे व्यापारी लाखी कुटुंबाने अयोध्येतील श्री रामजन्मभूमी (Ram Mandir) मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. सुरतच्या सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्यांपैकी एक, दिलीप कुमार व्ही. लाखी यांच्या कुटुंबाने दान केलेल्या 101 किलो सोन्याने मंदिराच्या दारावर चढवले गेले आहे. यासोबतच राम मंदिर ट्रस्टला मिळालेली ही देणगी आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
कुठे वापरले सोने ?
हे 101 किलो सोने राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब यांना चकाकी देण्यासाठी वापरले गेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासोबतच मंदिराच्या तळमजल्यावर 14 सुवर्णद्वार (Ram Mandir) बसविण्यात आले आहेत.
सुमारे 64 कोटी रुपयांची देणगी
सध्या सोन्याचा भाव 64 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. अशाप्रकारे पाहिले तर एक किलो सोन्याची किंमत सुमारे 64 कोटी रुपये आणि 101 किलो सोन्याची एकूण किंमत सुमारे 64 कोटी रुपये होती. अशा प्रकारे लाखी कुटुंबाने राम मंदिरासाठी (Ram Mandir) सर्वाधिक रक्कम दान केली आहे.
मोरारी बापूंनी दिली 11 कोटींची देणगी
राम मंदिरासाठी (Ram Mandir) दान देण्याच्या बाबतीत कथाकार आणि अध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या त्यांच्या रामभक्तांनीही स्वतंत्रपणे 8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचवेळी गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गोविंदभाई ढोलकिया हे हिरे कंपनी श्रीरामकृष्ण एक्सपोर्ट्सचे मालक आहेत.