Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिर उदघाटनाला (Ram Mandir Ayodhya) अवघा १ दिवस राहिला असून संपूर्ण देशात आनंद आणि उत्सवाचे वातावरण आहे. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो रामभक्त अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. संपूर्ण अयोध्या नगरी दिमाखात सजली आहे. राम मंदिरात विशेष विधी सुरू असून आज रामलल्लाच्या मूर्तीला १०० हून अधिक कलशांच्या स्नान पाण्याने घालण्यात येणार आहे. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी कारसेवकपुरमला फुलांनी सजवण्यात आले आहे.
याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने ट्विट केले की, ‘रविवारी प्रस्थापित देवतांची नित्य पूजा, हवन, पारायण इत्यादी, पहाटे मध्वधिवास, 114 कलशांतील विविध औषधी पाण्याने मूर्तीचे स्नान, महापूजा, उत्सव, प्रसादात परिक्रमा. मूर्तीचे, शय्याधिवास. तत्लन्यास, महान्यास आदिन्यास, शांती-पौष्टिक – अघोर होम, व्याहती होम, रात्रीची जागर, संध्याकाळची पूजा आणि आरती होतील. राम मंदिर उदघाटन सोहळ्यापूर्वी पार पडणारे सर्व विधी आणि पूजा (Ram Mandir Pran Pratishta) याबाबत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सातत्याने अपडेट्स देत असते.
आज दिनांक 20 जनवरी 2024 को मण्डप में नित्य पूजन, हवन, पारायण आदि कार्य भव्यता से संपन्न हुए। प्रातः भगवान् का शर्कराधिवास, फलाधिवास हुआ। मन्दिर के प्रांगण में 81 कलशों की स्थापना एवं पूजा हुई। 81 कलशों से प्रासाद का स्नपन मन्त्रों से भव्य रूप में सम्पन्न हुआ। प्रासाद अधिवासन,… pic.twitter.com/FvU1axRBZD
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 20, 2024
काल शनिवारी वैदिक विधींच्या पाचव्या दिवशी, राम मंदिरात साखर आणि फळांसह प्रार्थना आणि हवन करण्यात आले. याबाबत सुद्धा श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने ट्विटरवर पोस्ट करत म्हंटल कि, “20 जानेवारी 2024 रोजी नित्यपूजा, हवन इ. साखर आणि फळे देऊन विधीही करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात 81 कलश बसवून पूजा करण्यात आली. संध्याकाळची पूजा आणि आरतीही झाली.
8000 दिग्गजांची राहणार उपस्थिती – Ram Mandir Pran Pratishta
दरम्यान, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती भव्य दिव्य राम मंदिराचे उदघाटन (Inauguration of Ram Temple) पार पडणार आहे. कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून या सोहळ्यासाठी देशभरातील ८००० दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आणि राम मंदिराच्या उदघाटनासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. उद्या हा उदघाटन सोहळा पाहण्यासाठी सर्वच रामभक्त सज्ज झाले आहेत.