ऊसतोडणी कामगाराचा मुलगा झाला आमदार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राम सातपुते विजयी झाले. सातपुते यांनी राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा ६ हजार मतांनी पराभव केला. मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व असलेल्या माळशिरसमधून ऐनवेळी उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्या आहार. भाजपाने येथून राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती.

राम सातपुते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद होते. सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे सातपुतेंचा जनसंपर्क चांगला आहे. राम यांचे आई-वडील ऊसतोडी कामगार होते.

सातपुते यांची घरची परिस्थिती डबघाईची आहे. माळशिरस तालुक्यातील भांबुर्डीची कायम दुष्काळी गावात राम सातपुते यांचे लहानपण गेले. वडील विठ्ठल सातपुते यांनी ऊस तोडणीचे काम करुन मुलांना शिक्षण दिले. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे १९९० ते १९९५ पर्यंत ऊस तोडणीचे काम करत होते. माध्यमिक शिक्षणानंतर राम सातपुते यांनी पुणे गाठले. त्यांचा विद्यार्थी परिषदेशी संपर्क आला. सातपुते यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील काम पाहून त्यांना भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले होते.

Leave a Comment