राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास कामासाठी सुद्धा २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील राम शेवाळकर यांच्या वाडा तसेच परतवाड्यातील प्रबोधनकार ठाकरे यांचा वाडा क्षतिग्रस्त झालेला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांची दिसत असलेली दुरावस्था वेळोवेळी माध्यमांनी दाखवल्यानंतर तसेच राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे आज राज्याच्या अर्थसंकल्पीय धोरणामध्ये विकास आराखडा मांडल्याने अचलपूरचे नाव प्रथमच राज्याच्या बजेटमध्ये झळकल्याची बाब देखील बच्चु कडूंनी सांगितली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment