कराडच्या स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण : पालिकेतर्फे 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कराड नगरपालिकेच्यावतीने 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके दिली.

कराड पालिकेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डाके म्हणाले की, कराडला पालिकेच्यावतीने आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धां घेण्यात येत आहेत. यामध्ये नगरपालिका पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि कोविड योध्दे यांच्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे.

क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंट, टेबल टेनिस, मार्शल आर्ट्स, कराटे, फुटबॉल, लेदर बॉल क्रिकेट, बॉडी बिल्डिंग, स्विमिंग, कबड्डी, टेनिस क्रिकेट, कुस्ती, स्केटिंग आदी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच स्पर्धांदरम्यान राष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंच्या सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. 23 एप्रिल ते दि. 29 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता सर्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बक्षीस वितरणास ‘ही’ खास पाहुणी राहणार उपस्थित

कराड येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांवेळी कराड नगरपालिकेच्या मागणीतून कराड येथील स्टेडियमसाठी जमिनी देणाऱ्या दानशूरांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ऑलम्पिक खेळाडू ललिता बाबर- भोसले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध मान्यवरांना देखील या बक्षीस समारंभ कार्यक्रमास आमंत्रित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.