…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर कोण जिंकणार, कोण हरणार हे समजणार असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामसाद आठवले यांनी मोठे विधान केले. “महाविकास आघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. निवडणुकीत भाजपचा विजय झाला, तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका आठवलेंनी केली आहे.

अकोला येथे आज महापालिकेसह राज्यातील आगामी महापालिका निवडणूका लढणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, आम्हाला अपक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे. छोट्या मोठ्या पक्षांचाही पाठिंबा मिळतो आहे आणि आमच्याकडे देखील मते आहेत.

त्यामुळे भाजपाला राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत देखील यश मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आमची पाचवी जागा निवडून येईन, असा विश्वास यावेळी मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. आता सायंकाळी निकालानंतर विधान परिषद निवडणुकीत कोण जिकेलं हे समजणार आहे.