अन्यथा मोठा फटका बसेल – रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

पुणे प्रतिनिधी \  राज्यात युतीचं घोंघडं भिजत असताना त्यावर काल भाजप आणि शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन येत्या निवडणुकीचा सामना एकत्र येऊन करणार आहोत अशी घोषणा केली. युतीच्या गणितात रिपाई चं गणित अजून बसलेलं नाही. भाजप २५ तर सेना२३ जागा लढवणार असल्याची घोषणा केल्यानंतर रिपाई अध्यक्ष रामदास आठवले काहीसे अस्वस्थ झाल्याचं कळतंय.

भाजप – शिवसेनेची युती व्हावी यासाठी मी प्रत्येक वेळी आग्रही होतो आणि तो मी अनेक वेळा प्रयत्न केला आहे आणि इतकं करून सुद्धा रिपाई ला डावलण्यात आलं तर रिपब्लिकन जनता गप्प बसणार नाही. रिपाई ला एकही जागा न सोडल्याने ही नाराजी महाराष्ट्र भर रिपब्लिकन जनतेत पसरली आहे असं आठवलेंचं म्हणणं आहे.

रिपब्लिकन पार्टी ला एक ही जागा दिली नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात फटका बसू शकतो आणि हा अपमान माझाच नव्हे तर दलित जनतेचा अपमान आहे असं ही आठवले म्हणाले.
दरम्यान युती कडून अजूनही त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचं अधिकृत बोलणं झालं नाही आहे.

Leave a Comment