ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक होत असून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच वेळी पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी ऑक्सिजन तुटवड्यावर चेष्टेने बोलत वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. “धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा. असे विधान रामदेव बाबा यांनी केलं आहे.

डॉक्टर म्हणतात आपल्या शरीरात नाकाच्या रुपाने दोन सिलेंडर दिलेत, पायाच्या रुपात दोन डॉक्टर दिलेत आणि हाताच्या रुपात दोन नर्सेस दिल्या आहेत. लोक या सर्व गोष्टींचा उपयोग करत नाही. याचा उपयोग करुन शरीरात ऑक्सिजन भरा, असंही रामदेव बाबांनी म्हटलंय.

कुणालाही ऑक्सिजनची कमतरता पडली तर मला सांगा. ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 80 पर्यंत खाली आली होती त्यांना मी भस्रीका, कपालभाती, अनुलोम मिलोम एक तास करायला लावून त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 98 ते 100 पर्यंत वाढवली, असंही त्यांनी सांगितलं आहे. अनेक लोक रामदेव बाबांचं हे वक्तव्य असंवेदनशीलपणा असल्याचं म्हणत टीका करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment