रामदेव बाबांच्या पतंजलीची ऑनलाईन ऑर्डर साईट; मिळणार फ्री होम डिलिव्हरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच लोकांना खादीसारख्या वस्तूंची खरेदी तसेच या वस्तूंना पाठिंबा देण्याविषयी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्याच्या सुमारे ४८ तासांच्या आतच बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेद भारतात देशी उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी खास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे, ज्यामध्ये केवळ स्वदेशी उत्पादनेच उपलब्ध केली जाणार आहेत.

ही वेबसाइट सुरु केल्यानंतर, पतंजली स्वतःच्या आयुर्वेदिक उत्पादनांबरोबरच इतरही काही भारतीय उत्पादने यावरून उपलब्ध करून देतील. या साईटवरून लोकं त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंची ऑर्डर करू शकतील. तसेच, वेबसाईटवर ऑर्डर केल्याच्या काही तासातच त्याची फ्री डिलीव्हरीही केली जाईल. याव्यतिरिक्त, पतंजलीतील सुमारे १,५०० डॉक्टर आणि योग प्रशिक्षक २४ X ७ लोकांना विनामूल्य वैद्यकीय सल्ला देतील. हि वेबसाईट येत्या १५ दिवसात सुरू होईल असे सांगण्यात येते आहे.

पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी आचार्य बालकृष्ण यांनी या योजनेची पुष्टी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून देशी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बाळकृष्ण पुढे म्हणाले की, ‘ पतंजली केवळ देशी उत्पादनांचाच पुरवठा करेल. पतंजली सर्व स्थानिक किरकोळ विक्रेते तसेच लहान दुकान मालकांशी संपर्क साधून या स्वदेशी चळवळीला हातभार लावण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे त्यांना आमच्या व्यासपीठावर स्वदेशी उत्पादने विकता येतील. ते वेबसाइटशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांची उत्पादने फ्री मध्ये लोकांना डिलिव्हर करू शकतात. ‘

बालकृष्ण म्हणाले की घरगुती वस्तूंचे वाटप करणार्‍या लहान तसेच मध्यम उद्योगांना (एमएसएमई) या ई-कॉमर्स साइटमध्ये येण्यास प्रोत्साहित केले जाईल आणि त्याचा त्यांनाही फायदाच होईल.

पतंजलीची माहिती तंत्रज्ञान कंपनी, नवी दिल्लीस्थित भारवा सोल्यूशन्स, प्लस येथे या ऑनलाईन रिटेलसाठी हे नवीन अ‍ॅप विकसित केले गेले आहे. हे नवीन अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध होणार आहे. पतंजलीच्या सीईओने यावर भर दिला की उत्पादनांचे वितरण, विक्री तसेच पुरवठा यांचे व्यवस्थापन करण्यासाठी इन-हाउस सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे.

एका कार्यकर्त्याने सांगितले की या नवीन वेबसाईटवर ८०० पेक्षा जास्त पतंजलीच्या वस्तू उपलब्ध होतील. याव्यतिरिक्त, जवळपासच्या इतर स्टोअर्समधूनही उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना यादी उपलब्ध असेल. ते म्हणाले, “हि वेबसाईट मोठ्या प्रमाणावर बाजारात आणली जाईल आणि लोकांच्या मागणीनुसार आणखीही काही उत्पादने यामध्ये जोडली जातील,”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment