बामणोली येथे शेतकऱ्यावर रानगव्याच्या हल्ला : गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जावली तालुक्यातील पिसाडी येथील शेतकरी रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मण बाबुराव माने असे शेतकऱ्याचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पिसाडी गावचे लक्ष्मण बाबुराव माने (वय- 60) हे सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली गुरे चरायला सोडण्यासाठी शिवारात गेले होते. याच शिवारात त्यांची स्वतः चे शेत असून त्या ठिकाणी त्यांनी जोंधळा या पिकाची शेती केली आहे.

लक्ष्मण माने गुरे चरायला सोडून परतत असताना जोंधळा केलेल्या शेतात आल्यावर रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. माने हे रानगव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पूर्णपणे रक्तबंबाळ झाले. माने यांनी आरडाओरडा करताच गावातील ग्रामस्थ डोळेझाक शिवाराच्या दिशेने धावून गेले तोवर कालवा झाल्याने रानगवा पळून गेला.

Leave a Comment