दिल्ली | न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोईंच्या नियुक्तीची घोषणा केली. येत्या ३ ऑक्टोबर रोजी ते ४६ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. गोगोईंच्या निमित्ताने प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून गोगोईंचे नाव केंद्र सरकारला पाठवले होते. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून गोगोई १७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरन्यायाधीशपदी कार्यरत राहणार आहेत.
न्या. गोगोईंचा इतिहास –
२८ फेब्रुवारी २००१ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणुन नियुक्ती
१२ फेब्रुवारी २०११ रोजी पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणुन नियुक्ती
एप्रिल २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी
आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनसीआर) अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर सध्या देखरेख करण्याचे काम करत आहेत.
President of India has appointed Justice Ranjan Gogoi as the next Chief Justice of India. He will assume office on 3rd October, 2018 after the retirement of the current Chief Justice, Justice Dipak Misra. pic.twitter.com/UAIe6P8qNV
— ANI (@ANI) 13 September 2018