Ranjankhalage at nighoj : उन्हाळ्यातही न आटणारे रांजणखळगे; पुण्यातील ‘हे’ चमत्कारिक ठिकाण तुम्ही पाहिलंय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ranjankhalage at nighoj) महाराष्ट्रात फिरण्याजोगी अशी अनेक ठिकाण आहेत जिथे कायम पर्यटकांची गर्दी असते. तर काही ठिकाणी नैसर्गिक चमत्काराची अनुभूती देणारी आहेत. महाराष्ट्रातील मंदिरे, नद्यांचे संगम तसेच ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. अशा या विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रातील पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. तर मराठ्यांचा इतिहास जतन करणाऱ्या अनेक वास्तू पुणे शहरात पाहायला मिळतात. न केवळ ऐतिहासिक वास्तू तर भौगोलिक चमत्काराची प्रचिती येईल असे एक ठिकाण पुण्यातच आहे. जिथे उन्हाळा असो किंवा अगदी दुष्काळ जरी पडला तरीही पाणी आटत नाही. चला या ठिकाणाविषयी अधिक माहिती घेऊया.

निसर्गाचा चमत्कार

पुण्यातील शिरूर आणि नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच्या सीमेवरील कुकडी नदीच्या पात्रात जगप्रसिद्ध रांजण खळगे आहेत. रांजण खळगे म्हणजे काय? (Ranjankhalage at nighoj) तर नदीपात्रातील खडकात प्रवाहामुळे तयार झालेले खड्डे. एकीकडे उन्हामुळे नद्या, तलावामधील पाण्याची पातळी कमी होत असते. तर दुसरीकडे हे रांजणखळगे कधीच आटत नाहीत. हा खरोखरच एक नैसर्गिक चमत्कार आहे जो पाहायला अनेक लोक येत असतात.

कसे तयार झाले रांजणखळगे? (Ranjankhalage at nighoj)

नदीपात्रातील खडकात पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणाऱ्या खड्ड्यांना रांजण खळगे म्हणतात. पुण्यात कुकडी नदीच्या पात्रात हे रांजणखळगे पहायला मिळतात. लहान मोठ्या आकाराचे हे रांजण खळगे नदीच्या पात्रात २०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद अशा भागात जागोजागी आहेत. कुकडी नदीच्या काठावर दोन्ही बाजूला बेसॉल्ट खडक आहेत. ज्यात नदीतून वाहून आलेले दगड गोटे खोलगट भागांत अडकतात.

दरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे हे दगड गोटे गोलगोल फिरून खोलगट भागाचे अर्धगोलाकार खड्ड्यांमध्ये तयार झाल्याने हजारो वर्षानंतर या खड्ड्यांचे रांजणकार खळग्यांमध्ये रूपांतर झाल्याचे, तज्ञांनी सांगितले आहे. हे रांजण खळगे हा निसर्गाच्या भौगोलिक चमत्कारांपैकी एक विशेष चमत्कार आहे. (Ranjankhalage at nighoj) ज्याच्या विषयी जाणून घेण्यासाठी आणि ते पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. विशेष करून कुकडी नदीच्या पात्राजवळ असलेल्या कुंडमाऊली मळगंगा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हे रांजणखळगे पाहण्यासाठी हमखास मोठी गर्दी होत असते.

दुष्काळ पडला तरी पाणी आटत नाही

पुण्यातील या रांजणखळग्यांचे एक विशेष वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे, कडक उन्हाळा असो किंवा दुष्काळ जरी पडला तरीही यातील पाणी काही आटत नाही. कुकडी नदीच्या पात्रात असणारे हे रांजणखळगे तयार झाल्यापासून यामधील पाणी आज पर्यंत कधीच आटलेले नाही. (Ranjankhalage at nighoj) तसे कुणाच्याच पाहण्यात तरी आलेले नाही.