रणवीर सिंग जगात भारी! सेलिना गोमेजला पछाडत ठरला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रणवीर सिंग बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंकडिन यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो सुपरहिट आहे. मात्र आता Giphy या नव्या प्लॅटफॉर्मवर देखील त्याने इतर सेलिब्रिटींना पछाडले आहे. Giphy वर एक कोटी व्हूज मिळवणारा तो जगातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे.

Giphy एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टाग्राम प्रमाणेच यावर देखील व्हिडीओ, फोटो वगैरे पोस्ट केले जातात. या प्लॅटफॉर्मवर रणवीरने पॉपस्टार सेलिना गोमेजला पछाडत सर्वाधिक व्हूज मिळवले आहेत. सध्या त्याने जगभरातून तब्बल एक कोटी व्हूज मिळवले आहेत. तर सेलिना गोमेजला ९० लाख ६१ हजार व्हूज मिळाले आहेत.

सर पॉल मॅक्कार्टनी, मडोना, टेलर स्विफ्ट, एरियाना ग्रँड यांसारखे अनेक नामांकित सेलिब्रिटी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.