व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्री नसले तरीही राज्य चांगल्या प्रकारे सुरु आहे; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आजारपणामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकींना हजेरी लावली जात आहे. यावरून भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “राज्यातील गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य चांगले सुरू आहे,” अशी टीका दानवे यांनी केली आहे.

राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज्यात सध्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे. राज्यात अनेक निर्णय घेतले जात आहेत. आजारपणामुळे आता मुख्यमंत्री सध्या खुर्चीवर नाहीत. ते खुर्चीत नसतानाही राज्य़ चांगलया प्रकारेचालले आहे. यामागचे खरे श्रेय कोणाचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांना नसून राज्यातील जनतेचे आहे.”

“आपल्या राज्यातील जनता हि अत्यंत संयमी आहे. त्यामुळे राज्य व्यवस्थित सुरू आहे. असे असताना राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते गृहमंत्री फरार आहे. आणि त्यांच्याप्रमाणे पोलीस आयुक्तही फरार असल्याची टीका यावेळी दानवे यांनी केली आहे.