मनसे-भाजप युतीबाबत रावसाहेब दानवेंनी केले ‘हे’ मोठे विधान; म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हिंदुत्वाचा नारा देत भाजपच्या नेत्यांची स्तुती केली. तर शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी मोथे विधान केले आहे. “राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती होणे शक्य नाही,” असे दानवे यांनी म्हंटले आहे.

रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नुकताच गुडीपाडवा हा सण पार पडला. यंदाही मनसेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने चालले आहेत. माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. पण वेगळ्या विषयावर भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी काल मुंबई येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये कमरा बंद चर्चा झाली. दोन्ही नेत्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र भाजप-मनसे युतीबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक कयास लगावले जात आहेत, असेही शेवटी दानवे यांनी म्हंटले.

Leave a Comment