Rap Song : तरुण रॅपरची कमाल; ‘मला गाव सुटनाss’ गाण्याचं नवं व्हर्जन ऐकून प्रेमातच पडाल

Rap Song
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rap Song) मराठी सिनेविश्वातील गाजलेल्या ‘बॉईज’ सिरीजमधील ‘बॉईज ४’ या चित्रपटातील एका गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतल होत. ‘काय सांगू रानी, मला गाव सुटना’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः खुळावलं होत. या गाण्यामध्ये गावाच्या मातीशी नाळ जोडलेल्या व्यक्तीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अजूनही या गाण्यावरील अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर या गाण्याचं रॅप व्हर्जन व्हायरल होत आहे. एका तरुणाने ‘मला गाव सुटना’ या गाण्यावर बनवलेलं हे रॅप सध्या कमालीचे चर्चेत आहे.

व्हायरल व्हिडीओ (Rap Song)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण ‘काय सांगू राणी, मला गाव सुटनाsss’ या लोकप्रिय गाण्याचं रॅप व्हर्जन गाताना दिसतोय. हे रॅप व्हर्जन एकदा ऐकल्यानंतर सतत ऐकावं वाटेल इतकं भन्नाट आहे. या रॅप व्हर्जनसाठी तरुणाने लिहिलेले बोल अगदी भारावून टाकणारे आहेत. अत्यंत वेगळ्या शैलीत त्याने मूळ गाण्याची चाल न मोडता मिक्स केलेलं हे रॅप तरुण वर्गाला विशेष भावताना दिसत आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी पाहिला आहे आणि शेअरदेखील केला आहे.

कोणी तयार केलं रॅप?

आतापर्यंत या रॅप सॉन्गला ७५. १K लाईक्स मिळाले आहेत. ट्रेंडिंग व्हिडिओंमध्ये या व्हिडिओचा समावेश झाला असून हे रॅप सादर करणारा हा तरुण एक उत्तम सिंगर आणि तितकाच लोकप्रिय रॅपर आहे. ज्याला सोशल मीडिया युजर्स ‘रॅप बॉस’ म्हणून ओळखतात. (Rap Song) सोशल मीडिया इंस्टाग्राम आणि युट्युबवर या तरुणाचे ‘रॅप बॉस’ या नावाचे हॅण्डल्स आहेत.



ज्यावर तो कायम वेगवेगळ्या गाण्यांचे रॅप व्हर्जन शेअर करताना दिसतो. हे रॅप व्हर्जन तयार करताना तो मूळ गाण्यासोबत कोणतीही छेडछाड न करता अत्यंत निर्मळ आणि साजेशा अर्थपूर्ण शब्दांचे रॅप तयार करतो. यामुळे नेटकरी ‘रॅप बॉस’ला विशेष पसंती देताना दिसतात.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर rapboss805 नावाचं हॅण्डल आहे. ज्यावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली पसंती दर्शवली आहे. (Rap Song) एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय, ‘गांव गली का हर पत्थर याद आने लगता है। दिन ढलते ही अपना घर याद आने लगता है।’ तर आणखी एकाने लिहिलंय, ‘कडकच भावा’. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे की, ‘भावा पहिल्यांदा एवढं भारी रॅप सॉंग ऐकलं’. तर अन्य एकाने म्हटले, ‘भावा तुझ्या रॅपचा नाद नाही करायचा’.