लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमधील एका जंगलात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध लावला आहे. या प्रकरणातील तरुणीची हत्या इतकी निर्घृणपणे करण्यात आली होती, की शवविच्छेदन करणारे आणि हा रिपोर्ट पाहाणारे हैराण झाले आहेत. मृतदेहावर अनेक ठिकाणी चाकूचे वार करण्यात आले होते तर कपडेही फाटलेले होते. यानंतर पोलिसांनी बलात्काराच्या अँगलने या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी मृत तरुणीच्या प्रियकरासह तिघांना अटक केली आहे. या तरुणीचा मृतदेह उत्तर प्रदेशातील सरोजनी नगर परिसरातील गहरू जंगलात आढळून आला होता.
या तरुणीच्या प्रियकराचे नाव कैफ असे आहे. या कैफच्या मित्रांना तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे होते. मात्र मृत तरुणीने यास नकार दिला म्हणून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तिच्यावर तब्बल 24 वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत. तो चाकू तुटून तरुणीच्या हाडांमध्ये अडकेपर्यंत ते वार करत राहिले. या आरोपींनी तरुणीला दोरीने बांधून तिच्या पाठीवर, पोटावर आणि गळ्यावरदेखील वार केले. या आरोपींनी तिच्या गळ्यामध्ये दोरी बांधली यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या मृत मुलीची मोहम्मद कैफ नावाच्या एक मुलासोबत मैत्री होती, या दोघांचे फोनवर बोलणेही होत असे. कैफदेखील सरोजनी नगरमध्येच राहायचा. 12 जूनला तरुणीने कैफला सांगितले कि तिचे वडील घरी नाहीत आणि आईदेखील गावी गेली आहे.हे समजताच कैफनं तिला शहराबाहेर फिरायला जाण्यासाठी राजी केले. यानंतर आरोपी तिला गहरू जंगलात घेऊन गेला. त्या ठिकाणी कैफचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. नशेत असणाऱ्या या तिघांनी आधी तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या मृत तरुणीच्या मृतदेहापासून काही अंतरावर दारुची आणि पाण्याची बाटली, पान मसाल्याचे पाकीट आणि ग्लास आढळले होते. मृत तरुणी हि लखनऊपासून तब्बल 80 किलोमीटर दूर असलेल्या सीतापुर येथील रहिवासी आहे. मृत तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितले कि त्यांची मुलगी 12 जून रोजी संध्याकाळी घरातून गायब झाली होती. त्यावेळी तिची आई आणि वडील दोघेही घरी नव्हते.