धक्कादायक ! बकरी चरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीस ओलीस ठेवून केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाडमेर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीने प्रथम मुलीला डोंगरावर नेले, तिथे तिला ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला बेशुद्ध असल्याचे समजून मारण्याचा प्रयत्नही केला. आरोपीने पीडितेच्या गळ्याला दोरी लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आरोपीला अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचे वाटले आणि आरोपी पळून गेला आहे.

पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. महिला सेलच्या उपअधीक्षक सीमा चोप्रा यांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, अल्पवयीन पीडितेवर बलात्काराची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी बकरी चरायला गेली होती. दरम्यान, ४० वर्षीय भोपाळ सिंगने तिला ओलीस ठेवले आणि डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून पीडितेची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच पालकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.

पीडित मुलगी बकरी चरायला गेली होती
पीडितेने सांगितले कि ती नेहमीप्रमाणे बकरी चरायला गेली होती. या दरम्यान आरोपीने तिला जबरदस्तीने ओलीस ठेवले. या दरम्यान पीडितेने विरोध केला असता आरोपीने पीडितेवर बलात्कार केला, त्यानंतर तिला सोडून पळून गेला.

Leave a Comment