Tuesday, June 6, 2023

वाईत 22 वर्षीय महिलेवर बलात्कार : मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने प्रकार

सातारा | मुंबईतील महिलेच्या पती व सासूचा विश्वास मिळवून मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने 22 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील महिलेसोबत हा प्रकार घडला असून वाई आणि यवतमाळ येथे बलात्कार केल्याची फिर्याद पिडीत महिलेने दिली आहे. या प्रकरणी विठ्ठल गणपत पवार (पत्ता माहिती नाही) याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची माहिती अशी, मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून 22 वर्षांच्या महिलेला मूल होण्यासाठी आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने वाई येथे आणून बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकाराने वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे. मुंबई येथील एका 22 वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूची विठ्ठल गणपत पवार या व्यक्तीची ओळख होती. त्या व्यक्तीने तिच्या सासऱ्याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते. अशी बतावणी करुन त्या महिलेला वाईमध्ये आणले.

वाई शहरातील एका अपार्टमेंटमध्ये आणून एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच मारहाण करत बलात्कार करण्यात आला. विठ्ठल पवार याने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे या महिलेला नेले. तेथेही मारहाण करुन जबरदस्तीने त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध केले. याची माहिती कोणास दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विठ्ठल पवार याच्याविरुद्ध संबंधित महिलेने कुर्ला मुंबई येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेथून ही तक्रार वाई पोलीस ठाण्यात आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, असून अधिक तपास वाई पोलिस करत आहेत.