रक्षाबंधनच्या दिवशी एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, संपूर्ण बीड हादरलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणींना देत असतो. पण, असं असलं तरी विकृत लोकांमुळे आजच्या दिवसाला गालबोट लागला आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात दररोज महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आज पुन्हा एका 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कारकरण्यात आला आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शिंगारवाडी या ठिकाणी घडली आहे. गावातीलच या महिलेच्या नात्यात असलेल्या विक्रम काळे याने हे कृत्य केले आहे.

या नराधमाने पीडितेला सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देऊन अत्याचार केले होते. तसंच शेतामध्ये काम करत असतानाजवळ कोणी नसल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. हा नराधम सतत धमकी देऊन या महिलेवर अत्याचार करत होता. यामुळे पीडित महिलेने चकलांबा पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विक्रम काळे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस चकलांबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment