Wednesday, February 1, 2023

मिरजेत अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

- Advertisement -

सांगली | अल्पवयीन मुलीला गोळ्या खायला देऊन तसेच अश्लिल व्हीडीओ दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, फैय्याज मेहबुब कोकाणे (वय 25, रा. बोकड चौक, यशवंत बँकेसमोर, मिरज) याला अटक करण्यात आली आहे.

पिडीत मुलीच्या आईने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 22 मार्च रोजी त्यांची 12 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती. फैय्याज कोकाणे हा त्यावेळी घरी आला. त्याने आपल्या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिला घरातून बाहेर बोलावून नेले. त्यानंतर तिला कशाची तरी गोळी खायला दिली. पुन्हा घरात नेऊन बळजबरीने बलात्कार केला.

- Advertisement -

घडल्या प्रकाराबाबत पिडीत मुलीने आईला माहिती दिली. पिडीतेच्या आईने मिरज शहर पोलिसात धाव घेऊन फैय्याज मेहबुब कोकाणे याच्याविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला अटक करुन बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर करीत आहेत.