Saturday, June 3, 2023

पंचाहत्तर वर्षीय अंध वृद्धेवर बलात्कार

परभणी  | जिंतूर तालुक्यातील बेलखेडा येथे घरामध्ये एकटीच राहात असलेल्या व भिक्षा मागून खाणाऱ्या एका 75 वर्षीय व अंध वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पीडित वृद्ध महिलेने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की माझे पती आणि मुले जिवंत नसून मी घरात एकटीच राहते. दहा वर्षापूर्वी माझ्या डोळ्यांचे शस्त्रक्रिया झाली होते तेव्हापासून मला काहीच दिसत नाही. मी बेलखेडा गावातच राहते आणि भिक्षा मागून खाते दररोज प्रमाणे घरात रात्री मी भाकरी खाऊन झोपले होते.

माझ्या घराचे कोणीतरी दार वाजविले मी कोण आहे असे विचारले असता, बाहेरून कोणाचाही आवाज आला नाही. म्हणून मी दार उघडले नाही पण दार ढकलून व्यक्ती घरात आला आणि मला चुलीवर ढकलून खाली पाडले तसेच हिंदी भाषेत शिव्या देत माझ्यावर बळजबरी केली. कोणालाही सांगितले तर मी तुला जिवंत मारून टाकेल अशी धमकीही दिली. या घटनेमुळे गावांमध्ये खळबळ उडाली आहे.