सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे लाॅकडाऊन असताना गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. घरात कोणी नाही हे पाहून महिलेवर नात्यातीलच तरुणांकडून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील पलूस तालुक्यात घडला आहे. यामुळे नागठाणे आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
पलूस तालुक्यातील नागठाणे येथील महेश बंडोपंत गुरव व गिरीश जयंत गुरव उर्फ सोन्या या दोघांंवर त्यांच्या नात्यातील महिलेने भिलवडी पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 जुलै पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
महेश व गिरीश या दोघांनी ६ जून रोजी पीडित महिलेच्या घरी कोण नसल्याचे पाहून त्यांच्या घरात घुसून त्यांचे तोंड दाबून पीडितेवर बलात्कार केला. तसेच त्याचा व्हिडीओ तयार केल्याचे तसेच तो व्हिडीओ कुणाला दाखवल्यास पीडितेचा खून करेन, अशी धमकी त्यांना दिली असल्याचे फिर्यादित म्हंटले आहे.
दुरम्याम, या घटनेची माहिती मिळताच विटा पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे यांनी तत्काळ भिलवडी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. भिलवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, हवालदार चंद्रकांत कोळी, सचिन खाडे घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेने नागठाणे गावांमध्ये खळबळ उडाली असून महेश गुरव हा ग्रामपंचायत सदस्या सौ. गीतांजली गुरव यांचा पती आहे. भिलवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.