धक्कादायक ! लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वर्षभर बलात्कार

0
40
Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पलवल : वृत्तसंस्था – पलवल या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये लग्न करण्याचं आमिष दाखवून वर्षभर एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. लग्न करण्याचं आश्वासन देऊन जवळपास वर्षभर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आहे. यानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला पण आरोपीने तिला मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पीडित महिलेने सांगितले कि, ती स्वतःच्या पतीपासून वेगळी राहात असून तिचा पतीविरोधात घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. ती 25 सप्टेंबर 2020 पासून तिच्या प्रियकरासोबत पलवलमधील एका कॉलनीत राहात आहे. तो मढनाका गावाचा रहिवासी आहे. या व्यक्तीने लग्नाचं आमिष दाखवत पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, 28 ऑगस्टला तिनं त्याला लग्नाविषयी विचारलं असता त्यानं नकार देत पीडित महिलेला मारहाण केली. यानंतर पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु केली आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या जिल्ह्यात 6 दिवसांपूर्वी असेच एक प्रकरण समोर आले होते. यामध्ये एका 26 वर्षीय महिलेशी लग्नाचं आमिष दाखवत आरोपीनं शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान पीडिता गर्भवती झाली असता आरोपीनं तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. तिच्याशी चार वर्षे संबंध ठेवल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर पीडित महिला आणि आरोपीमध्ये वाद झाला. यानंतर आरोपीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेला मारहाण केली. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here