पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार १२ मे २०१५ ते २८ नोव्हेंबर २०२० दरम्यान देहूगाव, लोणी काळभोर, तळेगाव या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अटक केलेल्या तरुणाचे नाव सुमित सुशांत नाईक आहे. आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर त्याने त्या तरुणीला आपल्या दुचाकीवरून घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर बलात्कार केला आणि तिची फसवणूक केली.
अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकारचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे करत आहेत.